पुणे

दहा टक्के शूल्क भरून शिका एमएससीआयटी, टॅली कोर्स

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा उपक्रम
पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेंतर्गत एमएस-सीआयटी व टॅली (जीएसटी) च्या प्रशिक्षणाची सुविधा अल्पदरात शहरातील पाच ठिकाणी उपलब्ध आहे. लाभार्थ्यांना केवळ दहा टक्के शुल्क भरून प्रशिक्षण घेता येणार असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नियंत्रणाखाली चिंचवड येथील संभाजी नगरच्या साई उद्यान, चिंचवड- केशवनगर येथील माध्यमिक विद्यालय, भोसरी-लांडेवाडीतील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, निगडी येथील किर्ती माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव येथील माध्यमिक विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एमएससिआयटी/टॅली (जीएसटी)कोर्सेसचे प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. यामध्ये कोर्सेच एकूण प्रशिक्षण शुल्क तीन हजार आठशे रुपयांपैकी लाभार्थ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून प्रवेश घेता येणार आहे. तसेच, महिला प्रवर्ग, अपंग व मागासवर्गीय लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. तरी, प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी या केंद्रांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button