breaking-newsआंतरराष्टीय

दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्‍या बगदादी ठार?

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्‌विटमुळे जगभरात विविध चर्चांना उधाण

वॉशिंग्टन : दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्‍या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. बगदादीला अमेरिकेच्या सैन्याने लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, थोड्यावेळापूर्वीच काहीतरी खूप मोठं घडले आहे, असे ट्‌विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे जगभरात विविध चर्चांना उधाण आला असून ट्रम्प काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या ट्‌विटनंतर विविध शक्‍यता वर्तवल्या जात असून जगभरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Donald J. Trump✔@realDonaldTrump

Something very big has just happened!175K6:53 AM – Oct 27, 2019Twitter Ads info and privacy114K people are talking about this

अमेरिकेच्या सैन्य दलाने शनिवारी वायव्य सिरियात झालेल्या हल्ल्यात बगदादीला लक्ष्य केल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. अमेरिकेच्या सैन्याने इसिसच्या तळांवर हल्ला केला, त्यावेळी बगदादीवर निशाणा साधण्यात आला. अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याचा हवाल्याने एका इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प थोड्याचवेळात घोषणा करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

एका वृत्तसंस्थेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर, अमेरिकेने बगदादीचा खात्मा करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे, असे वृत्त आणखी एका वृत्तसंस्थेने दिलं आहे. त्यातच अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तरी मोठं घडले आहे असे ट्‌विट केल्याने बगदादी मारला गेल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप बगदादी संबंधित सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button