breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना महापालिकेतर्फे अभिवादन

पिंपरी / महाईन्यूज

आपल्या मतांचा आणि विचारांचा प्रचार, प्रसार करण्याचे साधन म्हणून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून बजावलेली भूमिका आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे, असे मत उपमहापौर केशव घोळवे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर केशव घोळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्या अनुराधा गोरखे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८१२ रोजी दर्पण वृत्तपत्राची सुरुवात करुन नवा आयाम निर्माण केला. पत्रकारीतेचा वारसा निर्भिडपणे चालविणा-या सर्व माध्यम प्रतिनिधींना जांभेकरांच्या माध्यमातून प्रेरणा मिळत राहील, असे सांगून पत्रकारांनी समाजाच्या उन्नतीसाठी दीपस्तंभासारखे काम करावे, असे आवाहन ढाके यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button