breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दत्ताकाका साने यांना व्यंगचित्रातून श्रध्दांजली, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी

गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे तसेच महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडणारे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक दत्ता साने यांचे आज कोरोनामुळे (शनिवारी) सकाळी निधन झाले. तर साने यांच्यावर काढलेले व्यंगचित्र सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे.

व्यंगचित्रकार गणेश भालेराव यांनी व्यंगचित्र काढत त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे. वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारे दत्ता साने यांनी विठूरायाला मिठी मारलेली व्यंगचित्रात दाखवले आहे तर “तुका म्हणे एक मरणाचि सरे । उत्तमचि उरे किर्ती मागे ॥” या जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेत अत्यंत भावनिक व्यंगचित्र रेखाटत साने यांना श्रध्दांजली वाहीली आहे.

दत्ता साने हे वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारे अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व होते. दरवर्षी त्यांचा पालखीमध्ये सहभाग असायचा.वारकर्यांना ते विवीध माध्यमातून सहाय्य तसेच किर्तन सोहळ्याचे आयोजन ते करीत असत. पिंपरी चिंचवड शहरात उभे रहात असलेल्या संतपीठाच्या निर्मीतीसाठी साने यांचा महत्वपुर्ण पाठपुरावा होता. साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button