breaking-newsपिंपरी / चिंचवड

दत्तनगर, चिंचवडमधील विद्युत खांब धोकादायक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दत्तनगर, चिंचवड येथील नागरी वस्तीमध्ये महावितरणाचा विद्युतवाहक खांब आहे. गेली 25 वर्षे झालेला हा लोखंडी खांब ठिकठिकाणी गंजला असून त्याला छिद्र पडले आहेत. त्यामुळे तो केव्हाही पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दत्तनगर येथे उघड्या तारांची जोडणी करण्यासाठी महावितरणने खांब उभारला आहे. त्यातून नागरिकांनी असंख्य घरगुती जोड घेतले आहेत. त्यामुळे खांबावर विद्युतवाहिनींचे जाळे निर्माण झाले आहे. हा लोखंडी खांब गंजला असून, अनेक ठिकाणी त्याला भोके पडले आहेत. त्यामुळे वेगवान वार्‍यामध्ये किंवा पावसाळ्यात हा खांब पडण्याची दाट शक्यता आहे.

धोकादायक खांब काढून नवा खांब उभारण्याची मागणी महावितरणच्या आकुर्डी उपविभागाकडे सामाजिक कार्यकर्ते मोसीन खान यांनी केली आहे. मात्र, दोन महिने उलटूनही त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button