breaking-newsपुणे

“दख्खनच्या राणी’चे 89 व्या वर्षात पदार्पण

 

  • डेक्कन क्‍वीनचा 1 तारखेला वाढदिवस होणार साजरा

पुणे – पुणे-मुंबई दरम्यान धावणारी आणि प्रवाशांची लाडकी असणारी डेक्‍कन क्वीन 1 जून रोजी 89 व्या वर्षात पदार्पण करत आहे. डेक्कन क्वीन ही दख्खनची राणी म्हणूनही प्रसिद्ध आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून 7 वाजून 15 मिनिटांच्या ठोक्‍याला सुटणाऱ्या डेक्कन क्वीनला 88 वर्षे पूर्ण होत असून प्रवाशांच्या लाडक्‍या डेक्कन क्‍वीनचा 1 तारखेला वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

1 जुन 1930 रोजी ही रेल्वे पहिल्यांदा धावली. त्यापूर्वी ही रेल्वे कल्याण ते पुणे धावत होती. त्यानंतर आताच्या सीएसटीपर्यंत ती धावायला लागली. डेक्कन क्वीन ही त्याकाळातील आशियातील सर्वात वेगवान रेल्वे होती. या गाडीला एकूण 17 डब्बे आहेत. त्यापैकी एक डब्बा महिलांसाठी असून, दोन वातानुकूलित, यातील काही डबे पास धारकांसाठी राखीव आहेत. तसेच देशातील पहिली विद्युतीकरणावर चालणारी रेल्वे आणि आयएसओ क्रमांक मिळवणारी रेल्वे ठरली आहे. पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी ती जीवनवाहीनीच आहे. सकाळी सव्वासात वाजले की डेक्कन क्वीन पुण्याच्या स्थानकावरून मुंबईकडे मार्गस्थ होते. आजही त्याच वेळेत डेक्कन क्वीन पुण्याहून धावते. संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी मुंबई सीएसटी स्टेशनवरून सुटते आणि पुण्यात रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी पोहोचते. अनेक प्रवासी रोज तिच्यामधून प्रवास करतात. प्रत्येकजण तिचा अनुभव घेतो.

  • प्रवाशांची जीवनवाहीनी
    डेक्कन क्वीनने आजवर अनेक उन्हाळे-पावसाळे अंगावर घेतले आणि प्रवाशांना सुखरूप इच्छित स्थळी पोहोचविले. आपल्या अखंड प्रवासात ही रेल्वे एकदाच 10 दिवसांच्या सुट्टीवर गेली होती. पुणे-मुंबई प्रवासादरम्यान लोणावळा येथील 27 नंबरच्या बोगद्यात तिचे डबे घसरले. मात्र कोणत्याही प्रवाशाला कसालाच त्रास झाला नाही. प्रवाशांची जीवनवाहीनी असणाऱ्या डेक्कन क्वीनचे येत्या 1 तारखेला सकाळी पुणे स्टेशनवर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button