breaking-newsआंतरराष्टीय
दक्षिण कोरिया अध्यक्ष-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा
सेऊल: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जेई इन यांनी रविवारी चर्चा केली आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात होणारी ऐतिहासिक चर्चा रद्द करण्याच्या किम यांच्या धमकीचा मुद्दा या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. उत्तर कोरियाने 12 जून रोजी होणाऱया शिखर परिषदेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे.
अण्वस्त्रांचा त्याग करण्याच्या अमेरिकेच्या मागणीमुळे उत्तर कोरियाने हे पाऊल उचलल्याचा दावा तेथील वृत्तसंस्था केसीएनएने केला. उत्तर कोरियाने या अगोदरच दक्षिण कोरियासोबत होणारी उच्चस्तरीय बैठक रद्द करण्याचे पाऊल उचलले आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात होणाऱया संयुक्त सैन्याभ्यासाला किम यांनी विरोध दर्शविला. किम यांच्या बदलत्या भूमिकेबद्दल ट्रम्प आणि मून यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.