breaking-newsपिंपरी / चिंचवड

थेरगावातील मनपा मुलींच्या शाळेतील संघाने कबड्डी स्पर्धेत पटकवले सलग दुस-या वर्षी अजिंक्यपद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे व जिल्हा क्रीडा परिषद मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले.

मुंबई येथील वर्सोवा येथे झालेल्या या स्पर्धेतील विजेत्या संघाचा आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू रिशांक देवाडीगा यांच्या हस्ते करंडक देवून सन्मान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माध्यमिक विद्यालय थेरगाव चा १७ वर्षाखालील मुलीचा संघ शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षीही सहभागी झाला होता. प्रतिस्पर्धी अमरावती संघाचा २९-१४ गुणांनी पराभव करून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले.

प्संघाची कप्तान मनीषा राठोड व उत्कृष्ट खेळाडू सह क्रीडा शिक्षक बन्सी आटवे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सोनाली जाधव, कृष्णराव टकले, तात्या बारणे व प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम आदी उपस्थित होते. अंतिम सामन्यात संघनायिका मनिषा राठोड हिने अष्टपैलू खेळ करत उत्कृष्ट पकड व चढाई केली. या संघातील चांदणी गायकवाड, शिफारस वरणाद, रूपाली डोंगरे, भूमिका गोरे यांच्या उत्कृष्ट खेळामुळे त्यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी त्या पूर्व प्रशिक्षणासाठी कर्नाटकात निवड झाली आहे.

या विजयी संघामध्ये पूजा तेलंग, तेजल महाजन, सखुबाई जाधव, सविता गवई, विद्या गायकवाड, निकीता माळी व कोमल राठोड यांचा समावेश आहे. क्रीडा शिक्षक बन्सी आटले व सोनाली जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, रज्जाक पानसरे यांचे सहकार्य या संघाला लाभले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button