breaking-newsताज्या घडामोडीपुणे
थेरगांवमध्ये पीएमपीच्या पास केंद्राचे उद्घाटन
पिंपरी (प्रतिनिधी):- ज्येष्ठ नागरिक, विध्यार्थी , अंध, अपंग व सर्व सामान्य नागरिकांच्या मागणीनुसार थेरगांवमधील 16 नंबर बस स्टॉप येथे पीएमपीएमएलने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पास केंद्र सुरु केले आहे. या पास केंद्राचे उद्घाटन स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका अर्चना तानाजी बारणे, मनिषा पवार, नगरसेवक कैलास बारणे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड आणि पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.
वाकड, थेरगाव, डांगे चौक परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अंध-अपंग तसेच विध्यार्थी यांची पास केंद्राअभावी गैरसोय होवू लागली होती. त्यामुळे थेरगांवमध्ये पास केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती. त्या मागणीची दखल घेऊन स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी १६ नंबर बस स्टॉपमध्ये पास केंद्र सुरु करण्याच्या सुचना पीएमपीएमएल अधिका-यांना केल्या होत्या. त्यानूसार थेरगांवमध्ये पास केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच वाकड चौक याठिकाणी देखील पास केंद्र सुरु केले जाणार आहे, असेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.