breaking-newsआंतरराष्टीय
थायलंड मधील गोळीबारात भारतीय नागरीक ठार
बॅंकॉक- थायलंडमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एकूण दोन विदेशी पर्यटक ठार झाले त्यात एका भारतीय नागरीकाचा समावेश आहे. या गोळीबारात अन्य पाच जण जखमी झाले असून जखमी नागरीकांमध्येही दोन भारतीयांचा समावेश आहे असे थाई पोलिसांनी आज सांगितले. काल रात्री सेंट्रल राटचाटथेवी जिल्ह्यात हा प्रकार घडला. दोन गटात गोळीबार सुरू असताना तेथे पर्यटकांना घेऊन येणाऱ्या दोन लक्झरी गाड्या थांबल्या होत्या. त्यात गाखेरजी धीरज हा भारतीय पर्यटक ठार झाला.
हे भारतीय पर्यटक तेथील एका भारतीय रेस्टॉरंट मध्ये जेवण करून पार्किंग लॉट मध्ये बस येण्याची वाट पहात असताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गोळीबार सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात तेथे पोलिस आल्यानंतर दोन्ही गटांतील गुन्हेगार पळून गेले. त्यांचा शोध जारी आहे.