breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थायरॉईडच्या विषयावर चिंचवड गाव येथे उमेद ऑनलाईन व्याखानमाला

– आमदार लक्ष्मण जगताप विचारमंचच्या वतीने आयोजन

पिंपरी | प्रतिनिधी
चिंचवड गाव येथे उमेद ऑनलाईन व्याखानमालेच्या चौथ्या पुष्पाचे आयोजन केले आहे. शनिवारी (दि. ६) सांध्यकाळी ७ वाजता ‘चला थायरॉईडला हरवूया’ या विषयावर हे व्याख्यान होणार आहे. डॉ. विनायक हराळे या बाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती स्वीकृत नगरसेवक तथा आमदार लक्ष्मण जगताप विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भोईर, संकल्प नागरी सहकारी पतसंस्था , मर्यादितच्या संचालिका पल्लवी विठ्ठल भोईर यांनी प्रसिद्धिपत्रकद्वारे दिली.

प्रसिद्धिपत्रकात नमुद केले आहे की, थायरॉईड हा सध्याच्या काळात परवलीचा आजार बनला आहे. सदासर्वकाळ राहणारा रोग म्हणजे थायरॉईड आहे. शरीराच्या ऊर्जेचे नियोजन करणारा घटक म्हणजे थायरॉईड होय. त्यामधे बिघाड झाल्यानंतर अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना थायरॉईड रोग होऊ शकतो. तथापि, महिलांना पुरुषांच्या तुलनेत पाच ते आठपट अधिक प्रमाणात थायरॉईड समस्या होऊ शकते. या महत्त्वाच्या विषयावर संवाद साधुन मार्गदर्शन करण्यासाठी थायरॉईड क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर डॉ. विनायक हराळे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन विठ्ठल व पल्लवी भोईर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button