breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थकीत भाडे भरण्यासाठी व्यावसायिकांना चौदा दिवसांची मुदत

पिंपरी – महापालिकेच्या भाडेतत्वावरील मिळकतींची तब्बल 34 लाख 95 हजार 836 एवढी भाड्याची रक्कम व्यावसायिकांकडे थकीत आहे. ही रक्कम भरण्यासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. थकबाकी न भरणा-यांच्या भाड्याच्या मिळकती सील करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ग प्रभाग अधिका-यांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 21, 23, 24 व 27 मध्ये महापालिकेच्या मालकीच्या मिळकती भाडे तत्वावर वापरण्यासाठी व्यावसायिकांना दिल्या आहेत. मात्र, भाडेकरूंनी भाड्याची रक्कम पालिकेला अद्याप भरलेली नाही. तब्बल 34 लाख 95 हजार 836 एवढी रक्कम थकीत आहे. जवाहरलाल नेहरू रोड (पिंपरी) येथील मनपा शाळा, यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल (पिंपरी वाघेरे), मच्छी मार्केट (थेरगाव, डांगेचौक), मटन मार्केट (डांगे चौक), भाजी मार्केट गाळे (डांगे चौक) या मिळकतींचे भाडे व्यवसायिकांनी थकविले आहे.

थकबाकीधारकांना अंतिम समज देण्यासाठी आयुक्त हर्डीकर यांनी आदेश काढले आहेत. 14 दिवसांच्या मुदतीत व्यावसायिकांनी थकबाकी महापालिकेच्या कोषागारात जमा करावी, अन्यथा भाडेकरारावर देण्यात आलेली मनपाची मिळकत ताब्यात घेण्यात यईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button