breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

त्या तीन रूग्णांनंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक रूग्ण झाला ‘कोरोनामुक्त’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाग्रस्त पहिल्या तीन रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका रुग्णाची 14 दिवसांनंतर करोना संसर्गापासून सुटका झाली आहे. तर, संशयित 30 जणांचेही रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण पॉझिटीव्ह आढळले होते. त्यानंतर लागोपाठ असे 12 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. त्यापैकी पहिले तीन रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले आहेत. आता आणखी एका रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले आहेत. या रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने आज आणखी एकदा तपासणीसाठी ‘एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहेत. या तपासणीत देखील रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर हा रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ असल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोनाचे संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या 30 संशयितांचे रिपोर्ट देखील ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, कोरोनाबाधित असलेल्या 9 जणांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मागील सहा दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button