breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…त्या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई झालीच पाहिजे – मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विकासकामांसाठी ठेकेदारांनी ‘परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट’ भरताना खोटी बँक ठेव भरून महापालिकेची फसवणूक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

यासंदर्भात चिखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, संबंधित दोषी ठेकेदारांना या गुन्ह्यासाठी भा. द. वि. कलम 420 नुसार किमान सात वर्षाचा कारावास अशा प्रकारची शिक्षा करावी. अशिया खंडात नामोल्लेख असलेल्या आपल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची अशी फसवणूक करणा-यांवर ठेकेदारांवर फौजदारी कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा मनसे याप्रकरणात आपणास कदापी माफ करणार नाही, असा इशारा देखील चिखले यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button