breaking-newsराष्ट्रिय

त्यांच्याकडे सापडल्या १८२ महिलांसोबतच्या सेक्स क्लिप्स, दोन्ही युवक बिझनेस फॅमिलीमधून

महाईन्यूज |

वेगवेगळया महिलांसोबत प्रणयाचे व्हिडीओ बनवून, ते सार्वजनिक करण्याची धमकी देणाऱ्या दोघा गर्भश्रीमंतांना कोलकात्ता पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. महिलांकडून पैसे उकळण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटकेत असलेले दोन्ही आरोपी कोलकात्यातील नावाजलेल्या औद्योगिक घराण्याचे सदस्य आहेत. या प्रकरणात एका आचाऱ्यालाही अटक करण्यात आलेली आहे. तो एका औद्योगिक कुटुंबात स्वंयपाकी आहे.

तीन महिन्यांच्या तपासामध्ये त्यांच्याकडे १८२ महिलांचे व्हिडीओ सापडलेले आहेत. तिन्ही आरोपींना काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. एका महिलेकडे १० लाख रुपये खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात पुढच्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button