breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

तेलुगू टीव्ही अभिनेत्री कोंडापल्ली श्रावणीची आत्महत्या

तेलुगू टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कोंडापल्ली श्रावणीने आत्महत्या केली आहे. हैदराबाद पोलिसांनी तिच्या तक्रारीवर कारवाई केली नाही तेव्हा श्रावणीने हे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, टिकटॉकवर भेटलेल्या देवराज रेड्डी नावाच्या व्यक्तीने केलेल्या शोषणाला कंटाळून श्रावणीने आपले जीवन संपवले. हैदराबादच्या मधु नगरस्थित राहत्या घरी 26 वर्षीय श्रावणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. गळवारी रात्री खोली बंद होती.

मंगळवारी श्रावणी तिच्या खोलीत गेली आणि आतून दरवाजा लॉक केला. बराच वेळ बाहेर न आल्याने कुटुंबाला संशय आला आणि त्यांनी दार तोडले. तेव्हा श्रावणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिथे तिला मृत घोषित केले.

बॉयफ्रेंड देवराज रेड्डीकडून सततच्या मिळत असलेल्या धमक्यांना कंटाळून श्रावणीने आत्महत्या केली, असे तिच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. श्रावणीने काही दिवसांपूर्वी पोलिसांत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी देवराज विरोधात कुठलीही कारवाई केली नाही. मात्र पोलिसांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिस अधिकारी नरसिम्हा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणी आणि देवराजच्या नात्यावर तिचे कुटुंबीय नाखुश होते. यावरुनच मंगळवारी रात्री श्रावणीचा तिच्या आई आणि भावासोबत वाद झाला होता. दरम्यान कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसांची एक टीम आंध्रप्रदेशातील कंकिडा शहरात देवराजला अटक करायला रवाना झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button