breaking-newsराष्ट्रिय

तेलंगणाच्या निकालावर काँग्रेसने व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

तेलंगणात पुन्हा एकदा के. चंद्रशेखर राव यांची तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. सध्याच्या अंदाजानुसार, टीआरएसने सर्वाधिक ९० जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने या निकालांवर संशय व्यक्त केला आहे. इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली असून त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे काँग्रेस नेते उत्तमकुमार रेड्डी यांनी म्हटले आहे.

ANI

@ANI

Telangana Pradesh Congress Committee’s Uttam Kumar Reddy on results: I am having doubts on results we’re getting in Telangana ballot paper counting. We’re doubting that tampering could have been done in EVMs. Slips should be counted in VVPATs. (File pic)

View image on Twitter

ANI

@ANI

Telangana Pradesh Congress Committee’s Uttam Kumar Reddy: All the Congress leaders will complaint to RO officers. We will also complaint to ECI on this matter. How can TRS leaders say before counting that who will lose in elections.

ANI यांची इतर ट्विट्स पहा

रेड्डी म्हणाले, मला या निकालांवर संशय आहे. यासाठी आम्ही व्हीव्हीपॅटमशीमधील मतदानाच्या स्लिप तपासणार आहोत. कारण आम्हाला इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे नेते निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारही करणार आहोत. कारण, टीआरएसचे नेते मतमोजणी आधीच निवडणूक कोण हारणार हे कसं सांगू शकतात.

ANI

@ANI

Hyderabad: Congress delegation submits a complaint to Telangana Chief Electoral Officer (CEO) Rajat Kumar raising suspicions that Electronic Voting Machines (EVMs) have been manipulated in the state.

३१८ लोक याविषयी बोलत आहेत

विधानसभेसाठी सिरसिला येथून टीआरएसचे केटी रामा राव, बांसवाडा येथून श्रीनिवास रेड्डी आणि अदिलाबादमधून जोगू रमन्ना आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे रेवांत रेड्डी पुढे आहेत. तर एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी हे निवडून आले आहेत. हैदराबादमध्ये टीआरएसच्या सदस्यांनी सातत्याने आघाडी घेतल्याने जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button