breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“तेजस्विनी’ सुस्साट…

  • ……तर शाळकरी मुलींसाठीही बससेवा
    सध्या शाळा, महाविद्यालये सुरू होणार आहेत. शहरात काही खास मुलींसाठी शाळा आहेत. अशा ठिकाणांहून जर बसची मागणी करण्यात आली, तर खास मुलींसाठी बससेवा सुरू करण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

10 मार्ग , 32 बसेस, 236 फेऱ्या

रोज सरासरी 8 हजार प्रवासी

पुणे– महिलादिनाचे औचित्य साधत खास महिलांसाठी सुरू केलेल्या “तेजस्विनी’ला चांगली पसंती मिळत आहे. महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी पीएमपीने खास महिला प्रवाशांसाठी शहरात दररोज 32 तेजस्विनी बस सुरू केल्या आहेत. याचा चांगला फायदा घेतला जात असून दिवसाला सरासरी 8 हजार महिला “तेजस्विनी’तून प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले.

“तेजस्विनी’ला महिलांचा अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्या एकूण 10 मार्गांवर 32 बसेसमार्फत “तेजस्विनी’ची सेवा दिली जात आहे. या मार्गांवर दररोज 236 फेऱ्या होत आहेत. पीएमपी प्रशासनाने आता “तेजस्विनी’ची सर्व माहिती ऑनलाइन देणे सुरू केले आहे. सुरूवातीला महत्वाच्या 9 मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र, मागणी वाढल्याने स्वारगेट ते वडगाव-धायरी या मार्गावर देखील बससेवा सुरू करण्यात आली. शनिवार, आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने काही प्रमाणात या बसेस मोकळ्या चाललात. यासाठी प्रशासनाने रविवारी “तेजस्विनी’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अन्य काही ठिकाणांवरून बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे. परंतु सध्या बसेसची संख्या कमी असून पुढील काळात जर बसेसची संख्या वाढली, तर मागणी केलेल्या मार्गावर बस सुरू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button