breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रदर्शन केले. आज ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जोरदार धक्का मिळाला आला आहे. आजी माजी खासदारांसह ११ आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे. जेव्हा प. बंगालमध्ये विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा २०० च्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांनी ममता सरकारमध्ये नाराज असलेल्या आमदार, खासदारांना फोडण्याचे प्रयत्न केला होता. आज या नाराजांनी अधिकारी यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला. यामध्ये तापसी मोंडल, अशोक दिंडा, सुदीप मुखर्जी, सायकत पंजा, शिलभद्र दत्ता, दिपाली बिश्वास,  सुक्र मुंडा, श्यामपदा मुखर्जी,  विश्वजीत कुंडू आणि बन्सारी मैती यांचा समावेश आहे. 

यानंतर  यांनी ममता यांच्यावर ममता सांगतात की भाजपा सर्व पक्षांतून नेत्यांची आयात करते. मात्र, त्यांना लक्षात आणून देवू इच्छितो की त्यांचा मूळ पक्ष हा काँग्रेसचा होता. ही तर साधी लाट आहे. मी ज्या प्रकारची त्सुनामी पाहतोय, याची ममता यांनी कल्पनाही केली नसेल. ममता आता एकट्याच राहतील. जे लोक भाजपात येत आहेत ते लोक माँ-माटी-मानुषच्या नाऱ्यासोबत पुढे आले होते. आज त्या लोकांचा मोहभंग झाला आहे, अशी टीका अमित शहा  केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button