breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तुमच्यामुळे पक्षाची बदनामी होतेय, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षाला पक्षातून हाकललं!

पिंपरी |महाईन्यूज|

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची 50 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असल्याने राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. तुमच्यावरील खंडणीच्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी बांदल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलीस चौकशीसाठी बोलवणार असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकणात आशिष पवार (वय 27), रमेश पवार (वय 32) आणि रुपेश चौधरी (वय 45) यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. यातील आशिष पवार हा काही दिवसांपूर्वी सराफांकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button