breaking-newsक्रिडा

‘तुझ्यात न्यू इंडियाचा आत्मा दिसतो,’ पंतप्रधानांचे धोनीला पत्र

नवी दिल्ली – भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं. तसंच, त्याच्या निवृत्तीसाठी शेवटची मॅच खेळवली जावी अशी आशाही व्यक्त करण्यात आली. त्यातच आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीला पत्र लिहिलं आहे.

मोदी यांनी पत्रामध्ये धोनीला म्हटले आहे की, ” धोनी तुझ्यामध्ये ‘न्यू इंडिया’ चा आत्मा दिसतो. ‘न्यू इंडिया’मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबियांची ओळख दाखवत नाही तर युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. धोनी तू, १५ ऑगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि हा व्हीडीओ बरंच काही सांगून जातो. यामध्ये खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावं, हेदेखील समजते.”

” धोनी, तुझ्या निवृत्तीमुळे १३० करोडो भारतीय निराश झालेले आहेत. पण गेल्या दीड दशकांमध्ये जे काही तु आम्हा सर्वाना दिले त्यासाठी देशवासीय तुझे आभारी आहेत. तुझ्या कारकिर्दीकडे जर आम्हाला पाहायचे असेल तर काही अंक किंवा आकड्यांचा चष्मा घालून आम्हाला पाहावे लागेल. तू भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये सामील आहेस. देशाला जगभरात अव्वल स्थानावर नेण्याची भूमिका तू योग्यपणे वठवली आहेस. क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुझे नावं, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम कर्णधार आणि कोणताही संकोच न करता सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये नक्कीच घेतले जाईल.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button