breaking-newsराष्ट्रिय

तुझा पाय तोडेन, केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियोंची भरकार्यक्रमात धमकी

केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांचा धमकी देतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित कार्यक्रमात बाबूल सुप्रियो यांनी एकाला थेट धमकीच दिली. सुप्रियो यांचे भाषण सुरु असताना तो व्यक्ती मंचासमोर वारंवार येत होता. यामुळे बाबूल सुप्रियो यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट धमकीच दिली.

आसनसोल येथे मंगळवारी सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगासाठी हे शिबीर होते. शिबिरात दिव्यांगांना व्हिलचेअर आणि अन्य आवश्यक साहित्यांचे वितरण केले जाणार होते. सुप्रियो यांचे भाषण सुरु होताच खाली लोकांमध्ये बसलेला एक जण वारंवार मंचासमोरुन जात होता. यामुळे सुप्रियो यांचा पारा चढला. सुप्रियो यांनी थेट त्या व्यक्तीला धमकीच दिली. ‘तुला काय झालंय ?, तुला काही अडचण आहे का?, मी तुझे पाय तोडेन आणि तुला कुबडी देईन, अशी धमकी त्यांनी दिली.

ANI

@ANI

What happened to you? Any problem? I can break one of your legs: Union Minister Babul Supriyo to a man during a program for differently abled people at Nazrul Manch in Asansol

सुप्रियो यावरच थांबले नाही, त्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनाही त्या व्यक्तीला घेऊन जायला सांगितले. तसेच उपस्थितांनाही टाळ्या वाजवून त्या माणसाचे कौतुक करायला सांगितले.  सुप्रियो हे भर कार्यक्रमात संतापण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी राम नवमी उत्सवातही बेशिस्त भाविकांवर संताप व्यक्त केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button