breaking-newsताज्या घडामोडी
तिरुपतीला जाणारे विमान रद्द; इंडिगोच्या कर्मचा-यास धक्काबुक्की👊
कोल्हापूर | महाईन्यूज
तिरुपतीला जाणारं विमान रद्द केल्यानं संतप्त प्रवाशांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीकेल्याचा प्रकार कोल्हापूर विमान तळावर घडला आहे. थंडी वाढल्यानं दृश्यमानता कमी झाल्यानं विमानसेवेवर परिणाम झालेला आहे. त्यामुळं कोल्हापूरहून तिरुपला जाणारं विमान अचानक रद्द करण्यात आलं.विमान रद्द झाल्याचं कळताच प्रवासी संतापले आहेत.
संतप्त प्रवाशांनी इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचा-यास जाब विचारत धक्काबुक्की केलेली आहे. त्यानंतर विमानतळ प्राधिकरणच्या अधिका-यांनी दिलगिरी व्यक्त करीत पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिलेलं आहे.