पिंपरी / चिंचवड

…तर साफसफाई संस्थांवर फौजदारी करणार!

  • स्थायी समितीचा निर्णय ः कामगारांची पिळवणूक थांबवा

पिंपरी:  साफसफाई व कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटी कामगारांची पिळवणूक करुन त्यांचा “ईएसआय’, “पीएफ’ व किमान वेतन न देणाऱ्या आरोग्य विभागातील 68, तर स्मशानभूमीचे कामकाज करणाऱ्या 41 संस्थांची चौकशी करुन दोषी आढळणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून फौजदारी दाखल करावी, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत साफसफाई व स्वच्छतेची कामे 68 संस्थांना वाटून दिलेली आहेत. तसेच, या एकाच व्यक्‍तींच्या दोन ते तीन संस्थांच्या नावावर त्यांनी कामे घेतली आहेत. यासह शहरातील स्मशनाभूमीची साफसफाई व सुरक्षेसाठी 41 संस्थाना कामे दिलेली आहेत. यातील अनेक संस्थाकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरु आहे. त्या कामगारांना साफसफाईची कामे करण्यास योग्य ती साधने, सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यांना किमान वेतन अवघे चार ते पाच हजार रुपये दिले जात आहे. या शिवाय त्यांचा कधीच ठेकेदार संस्थानी “पीएफ’, “ईएसआय’ भरलेला नाही. यामुळे कंत्राटी कामगारांचे संस्था ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात शोषण सुरु आहे.

दरम्यान, शहरात सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व संस्थांचे ठेके बंद करुन केवळ 12 ठेकेदार नेमावेत. या सर्व संस्थांची माहिती घेवून कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा. त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी. काहींनी बोगस पावत्या जोडून कामगारांचा “ईएसआय’ व “पीएफ’ दिल्याचे सांगितले आहे. याकरिता सर्वच संस्थाची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागास देण्यात आलेले आहेत.

साफसफाई संस्थासंदर्भात बैठक…
महापालिका क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 68 साफसफाई संस्था व स्मशानभूमी संदर्भातील 41 संस्थाची सर्व माहिती घेण्यासाठी स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांची उद्या (गुरुवारी) दुपारी 12 वाजता बैठक आयोजित केली आहे. यामध्ये सर्व संस्थाचा पोलखोल आरोग्य कार्यकारी अधिकारी मिनिनाथ दंडवते यांना मांडावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button