breaking-newsमनोरंजन

तब्बल ७ तास २० मिनिटांचा ट्रेलर तर चित्रपट ३० दिवसांचा

एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर किती मिनिटांचा असतो असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही साधारणपणे तीन ते चार मिनिट असं उत्तर द्याल. अवघ्या काही मिनिटांचा ट्रेलरच आपण आजवर पाहिलाय. पण आता असा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ज्याचा ट्रेलरच तब्बल सात तास २० मिनिटांचा आहे. इतक्या लांबीचा ट्रेलर असलेला हा चित्रपट ३० दिवसांचा आहे. तुम्हीही थक्क झालात ना!

इतक्या मोठ्या लांबीच्या या चित्रपटाचं नाव ‘अॅम्बियन्स’ असं आहे. या चित्रपटाचा फक्त एकच शो होणार असून त्यानंतर त्याची एकमेव कॉपी नष्ट केली जाणार आहे. तब्बल ७२० तासांच्या या चित्रपटाचा एक वेगळाच विक्रम होईल. ‘अॅम्बियन्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वीडिश दिग्दर्शक अँडर्स वेबर्ग यांनी केलं आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं.

कोणताही विक्रम मोडण्याच्या दृष्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही, असं वेबर्ग सांगतात. ३१ डिसेंबर २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र इतक्या लांबीचा हा चित्रपट कोण पाहणार हा प्रश्नच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button