breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

ड्युअल सेल्फी कॅमेरा,ड्युअल पंच-होल डिस्प्लेसह Realme 6 Pro भारतात लाँच

Realme कंपनीने भारतात आपली स्मार्टफोनची नवीन Realme 6 सीरिज लाँच केली आहे. कंपनीने या सीरिजअंतर्गत Realme 6 आणि Realme 6 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केलेत. 13 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्ट आणि realme.com वर Realme 6 Pro च्या विक्रीसाठी सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, Realme 6 चा पहिला सेल 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल.

Realme 6 फीचर्स काय ?
हा स्मार्टफोन Comet White आणि Comet Blue या दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.5 इंच पंच-होल डिस्प्ले असून यात MediaTek Helio G90T प्रोसेसर दिले आहे. Realme 6 च्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याला AI ब्युटी मोड, पोर्ट्रेट मोड, HDR सेल्फी मोड दिले आहेत. Realme 6 मध्ये 4,300 mAh ची बॅटरी आणि 30W फ्लॅश चार्जर असून एका तासात बॅटरी पूर्ण चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे.

Realme 6 Pro के स्पेसिफिकेशंस काय ?
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर असलेल्या Realme 6 Pro स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच ड्युअल पंच-होल डिस्प्ले असून ड्युअल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. स्नॅपड्रॅगन 720G हा दमदार प्रोसेसर असलेला Realme 6 Pro हा जगातील पहिलाच फोन असल्याचं सांगितलं जातंय. यातील मुख्य कॅमेरा 16MP आणि दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. हा फोन लाइटनिंग ब्लू, लाइटनिंग ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध असेल. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड असलेल्या या फोनच्या मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यातील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा, 12 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. या फोनमध्ये सुपर लाइनर स्पीकर असून हा फोन ISRO च्या NAVIC सॅटेलाइट सिस्टिमला सपोर्ट करतो. Realme 6 Pro मध्ये 4,300 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि 30W फ्लॅश चार्जर देण्यात आलं आहे. हा फोन तासाभरात पूर्ण चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button