breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डोनेशन उकळल्याने पालकांचा संताप; काळेवाडीतील शाळेविरोधात पोलिसांत केली तक्रार

  • महापालिका शिक्षण विभागाला पालकांचे निवेदन
  • वाकड पोलीस ठाण्यात केली लेखी तक्रार

पिंपरी – काळेवाडीतील विद्यादीप प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शाळेच्या शैक्षणिक शूल्कासह डोनेशन मागितल्याने पालकांनी याचा जाब विचारला असता संस्थाचालकाच्या मुलाने पालकांशी हुज्जत घातल्याचा प्रकार घडला. यासंदर्भात पालकांनी महापालिकेतील शिक्षण विभागातील प्रशासन अधिका-याकडे निवेदन दिले आहे. तर, वाकड पोलीस ठाण्यात संस्थाचालकावर गुन्हे दाखल करण्याची तक्रार केली आहे. त्यामुळे शासनचे अनुदान मिळत असताना पालकांकडून डोनेशन उकळणा-या संस्थेचा भांडाफोड झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत काळेवाडी येथे विद्यादीप प्राथमिक शाळा आहे. शाळेची विद्यार्थी संख्या सुमारे साडेतीनशेच्या आसपास आहे. ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे. तरीही, शाळेत विद्यार्थी प्रवेश देण्यासाठी डोनेशनची मागणी केली जाते. अनेक पालकांनी आजवर डोनेश देऊन वार्षिक शैक्षणिक शूल्कही भरले आहेत. त्यातील काही पालकांनी डोनेशन दिल्याची पावती मागितली असता बुधवारी (दि. 20) संस्थाचालकाच्या मुलाने पालकांसोबत उर्मटपणे बोलून हुज्जत घातली. दरम्यान पालकांशी धक्काबुक्की झाल्याने त्यांनी संबंधित शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालिकेतील शिक्षण विभागाकडे केली आहे. यासंदर्भात प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. पालकांनी शाळेच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतिश माने यांनी सांगितली.

 

विद्यादीप प्राथमिक शाळेत माध्यमिकचे वर्गही भरविले जातात. प्राथमिक शाळा शंभर टक्के अनुदानित आहे. मात्र, माध्यमिक शाळेला अद्याप शासनाचे अनुदान नाही. शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी 12 हजार रुपये डोनेशन घेतले जाते. त्याचबरोबर प्रवेशावेळीच शैक्षणिक शूल्क भरण्याची सक्ती केली जाते. इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण विद्यार्थ्याला आठवीच्या वर्गात प्रवेश दिला जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

 

विद्यार्थ्यांच्या पालकांनी पालिकेकडे लेखी तक्रार केली आहे. पालकांसोबत याविषयी चर्चा झाली आहे. संबंधित शाळा व्यवस्थापनासोबत चर्चा करून त्यामध्ये संधिग्दता आढळल्यास कारवाई करण्याचा निर्णय वरीष्ठ अधिका-यांच्या सूचनेप्रमाणे घेतला जाईल.

पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button