breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्याबाबत फारच उत्सुक

वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याबाबत स्वतः ट्रम्पही फारच उत्सुक आहेत. फेसबुकवर डोनाल्ड ट्रम्प नंबर वन असल्याची पोस्ट पडताच डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच दुसरी पोस्ट टाकली आहे.

फेसबुकवर मी नंबर १ वर असेन, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर दोन वर आहेत. मी आता दोन आठवड्यांच्या भारत दौऱ्यावर जात आहे. या भारत दौऱ्याबाबत मी फारच उत्सुक आहे, अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1228463577335554049

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी भारत दौऱ्याबाबतची उत्सूकता बोलवून दाखवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं की, ते भारत दौऱ्याची तयारी करत आहेत. जेथे लाखो लोग त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत.

व्हाईट हाऊसने 10 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची 24 आणि 25 फेब्रवारी रोजीच्या भारत दौऱ्याची घोषणा केली होती. ट्रंप अहमदाबाद आणि नवी दिल्लीमध्ये राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button