breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. सुजय विखेंना १ लाख १५ हजार मतांची आघाडी

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात मुख्य लढत होत आहे. सुरुवातीपासूनच भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. मतांच्या आघाडीेची आगेकूच विखे यांनी सुरुच ठेवली असून दहाव्या फेरीअखेर १ लाख हजार १५ हजार मतांची आघाडी घेतली आहे. आणखी १७ फे-या बाकी आहेत.

सकाळी आठ वाजल्यापासून अहमदनगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतमोेजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाली. दहाव्या फेरीअखेर डॉ.सुजय विखे यांना २ लाख ८७ हजार ६६५ हजार तर आमदार संग्राम जगताप यांना १ लाख ७२ हजार ५४३ मते मिळाली आहे. एकूण ४ लाख २५ हजार ५७९ एवढ्या मतांची मोजणी झाली.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.२६ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना ६ लाख ३ हजार ९७६ मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना ३ लाख ९५ हजार ५६९ मतं मिळाली होती.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. शेवगावमध्ये ६३.४० टक्के, राहुरी ६६.७७ टक्के, पारनेर ६६.१० टक्के, अहमदनगर शहर ६०.२५ टक्के, श्रीगोंदा ६४.७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४.१० टक्के मतदान झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button