breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. बाबासाहेबांचे कर्तृत्व नव्या पिढीसाठी दिपस्तंभासमान – महापौर माई ढोरे

पिंपरी / महाईन्यूज

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संकल्पनेवर आधारित राष्ट्र निर्मितीसाठी आणि मानव कल्याणासाठी आपले आयुष्य पणाला लावून सतत संघर्षशील राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. तसेच नवोदित पिढीसाठी ते दिपस्तंभासारखे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.

‍पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मीला बाबर, प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्या सुलक्षणा शिलेवंत – धर, माजी नगरसदस्य रामचंद्र माने, अंकुश कानडे, मारुती भापकर, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन पिपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड, बापुसाहेब गायकवाड, गणेश भोसले, धम्मराज साळवे, प्रकाश भुक्तर, राहूल सोनवणे, लक्ष्मण माने आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, भारतीय संविधानाच्या माध्यमातून सोषित, वंचित घटकांना आपले हक्क अधिकार मिळावेत यासाठी डॉ. बाबासाहेबांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. स्त्रीयांसाठी त्यांनी दिलेला लढा स्त्री मुक्तीसाठी आदर्शव्रत आहे. बाबासाहेबांच्या समताधिष्ठ लढयामुळे महिलांना देखील समानतेची संधी मिळून त्या विविध क्षेत्रात आपले नेतृत्व सिध्द करीत आहेत. असे सांगून नवीन पिढीने बाबासाहेबांच्या विचारांचे अवलोकन करुन राष्ट्र निर्मितीमध्ये आपले योगदान दयावे असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.

शहरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यांना पुष्पहार

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, गणेश भोसले उपस्थित होते. त्यानंतर एचए कॉलनी, पिंपरी येथील पुतळ्यासही महापौर ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, एससीएसटी संघटनेचे अध्यक्ष रमेश जाधव, पदाधिकारी मिलिंद जाधव, सुरेंद्र पासलकर, सर्जेराव जुनावने उपस्थित होते. तसेच दापोडी येथे झालेल्या कार्यक्रमात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसदस्या माई काटे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शंकर औताडे, कदम, पोलीस उप निरिक्षक शिखरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, रवि कांबळे, चंद्रकांत गायकवाड, संजय शेंडगे, अप्पा गायकवाड, गोरख ब्राम्हणे, सचिन गायकवाड, गरुदत्त जाधव, वंदन नवगिरे, अक्षय गायकवाड आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button