breaking-newsपुणेमहाराष्ट्र

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 5 वर्ष पूर्ण, खऱ्या सूत्रधारांपर्यंत कधी पोहोचणार- अंनिसचा सवाल

पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे.  मात्र अद्यापपर्यंत या हत्येमागील सूत्रधाराचा शोध लागलेला नाही. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली,  त्याच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून आज सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. शैला दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे आदी सहभागी झाले होते. त्याचबरोबर तरुणांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.

‘जवाब दो, जवाब दो, मोदी सरकार जवाब दो’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, ‘फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. डॉ. दाभोलकरांचे छायाचित्र तसेच घोषणांचे फलक यावेळी हातात धरण्यात आले होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून रॅली लक्ष्मी रस्ता, अलका चौक, शास्त्री रस्त्याने रॅली सिंहगड रोडवरील साने गुरुजी स्मारक येथे आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button