डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलमध्ये फिट इंडिया स्कूल आठवडा साजरा
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलमध्ये 18 ते 22 डिसेंबर दरम्यान ‘फिट इंडिया स्कूल आठवडा’ साजरा करण्यात आला. या उत्सवात शाळेच्या प्राचार्या, सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते.
‘फिट इंडिया स्कूल आठवडा’ अंतर्गत शाळेने वक्तृत्व स्पर्धा, आहार आणि पोषण, चित्रकला स्पर्धा, फन अँड फिटनेस, ऐरोबिक्स, झुंबा डान्स, योगा, निबंध, कविता, जाहिरात, विविध खेळ स्पर्धा आयोजित केले होते. यावेळी शाळेच्या प्राचार्या मृदुला महाजन, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकेतर यांनी उस्फुर्तपणे घेतला. शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी सर्वाना फिटनेसचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेच्या क्रीडा विभाग प्रमुख पार्वती बाकळे आणि क्रीडा शिक्षक संतोष बुटना, अक्षयकुमार परदेशी यांनी फिट इंडिया स्कूल आठवड्याचे नियोजन केले. या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.