breaking-newsआंतरराष्टीय

डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरख्याच्या वापरावर बंदी

कोपनहेगन (डेन्मार्क) – डेन्मार्कने सार्वजनिक ठिकाणी बुरख्याचा वापर करण्यावार बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधातील कायद्याला संसदेने गुरुवारी मान्यता दिली आहे. आता सार्वजनिक ठिकाणी बुरख्याचा वापर करणे हा गुन्हा झाला असून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. जर्मन संसदेतील 75 सदस्यांनी बुरख्यावरील बंदीचे समर्थन केले, तर 30 जणांनी बंदीला विरोध केल्याची माहिती डेन्मार्कच्या मीडियाने दिली आहे.

डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरख्यावरील बंदी 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. यापूर्वी फ्रान्स, ऑस्ट्रियासारख्या युरोपियन देशांनी सार्वजनिक ठिकाणी बुरख्याच्या वापरावर बंदी घातलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button