breaking-newsमनोरंजन

डेडपूल 2 साठी रणवीर सिंह बनला डबिंग आर्टिस्ट

हॉलिवूडचा सिनेमा “डेडपूल 2’साठी जगभरातील प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत. मात्र भारतातील प्रेक्षकांना या सिनेमाची प्रतिक्षा करण्याचे एक विशेष कारण आहे. याचे कारण म्हणजे “डेडपूल 2′ च्या हिंदी रुपांतरासाठी रणवीर सिंहने डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. त्याने रायन रेनोल्डसला आपला आवाज दिला आहे.

स्वतः रणवीर सिंहनेच ट्‌विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. डेव्हिड लीचने डायरेक्‍शन केलेला “डेडपूल 2′ हा सिनेमा याच महिन्यामध्ये रिलीज होतो आहे. 2016 मध्ये आलेल्या “डेडपूल’चा हा सिक्‍वेल असणार आहे. “डेडपूल’च्या सिरीजमध्यील नायक कोणत्याही आदर्शांना आणि तत्वांना कवटाळून बसण्याचा खटाटोप करत नाही. तो आपल्या पद्धतीने वाईटाचा सामना करत असतो. शिव्या शाप देतो आणि कोणाचीही पर्वा करत नाही. हॉलिवूडच्या एखाद्या सिनेमाचे डबिंग करणे ही रणवीर सिंहची पहिलीच वेळ आहे.

सध्या बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या “ऍव्हेंजर्स इनफिनिटी’मध्येही डबिंगसाठी एक भारतीय कलाकार आहे. “ऍव्हेंजर्स…’मधील थैनोस या पात्रासाठी डबिंग केले आहे राणा दग्गुपती याने 23 एप्रिलला हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाच्या तेलगू आवृत्तीत थैनोससाठी राणाने डबिंग केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button