breaking-newsपिंपरी / चिंचवड

डेटिंग वेबसाईटवर तरुणीचा मोबाइल नंबर ” कॉल गर्ल म्हणून दिल्याने तरुणाला अटक

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

डेटिंग वेबसाईटवर तरुणीचा मोबाइल क्रमांक कॉल गर्ल म्हणून अपलोड केला. त्यामुळे संबंधित तरुणीला वेगवेगळ्या मोबाइलवरून सतत फोन व मेसेज आले. संत तुकारामनगर, पिंपरी येथे २ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका तरुणाला करण्यात आली आहे.

याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरक्ष दत्तात्रय पानसरे (वय २२, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेया माहितीनुसार, फियार्दी तरुणीचा मोबाइल क्रमांक आरोपी पानसरे याने एका डेटिंग वेबसाईटवर कॉल गर्ल म्हणून अपलोड केला. त्यामुळे फियार्दी तरुणीला वेगवेगळ्या मोबाइलवरून सतत फोन कॉल्स येऊन व्हॉट्सअप मेसेजेसही आले. त्यांनी याबाबत पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलकडे अर्जाव्दारे तक्रार केली. त्यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button