breaking-newsपिंपरी / चिंचवड

डेंग्यु डास उत्पत्ती पाहणी मोहीम, चिखलीत हॉटेल मालकावर पालिकेची दंडात्मक कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डास उत्पत्ती होणा-या ठिकाणांची पाहणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एका मॉलमधील हॉटेलमध्ये डास उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई केली आहे.

महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत डेंग्यु व मलेरियाला आळा घालण्यासाठी डास उत्पत्ती ठिकाणांची पाहणी केली जात आहे. चिखलीच्या शिवाजीनगर येथील हॉटेल राठी रेसीडन्सी याठिकाणी डास उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब हॉटेल मालकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांना 5 हजार रुपयांचा दंड आकारून ही कारवाई केली आहे.

परिसर स्वच्छ ठेवणे, पेस्ट कंट्रोल करणे, साठलेले पाणी वारंवार स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. फ्लॉवर पॉट, फ्रिज, कुलर, छतावरील टाकाऊ साहित्य, टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टीकची खेळणी आदींसारख्या वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साठून राहिल्याने त्यामध्ये ‘एडीस एजिप्टाय’ या डेंग्यु सदृश्य डासांची उत्पत्ती होते. त्यापासून डेंग्यु, मलेरियासारख्या प्राणघातक अजाराला आमंत्रण मिळते. तरी आपल्या राहत्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button