breaking-newsराष्ट्रिय

डीएसपी अमन ठाकूर शहीद, ‘जैश’च्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. मात्र, या चकमकीत डीएसपी अमन ठाकूर यांना वीरमरण आलं. याशिवाय लष्कराचे दोन ते तीन जवानही जखमी झाले आहेत. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याची माहिती आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.

ANI

@ANI

Three Jaish-e-Mohammed terrorists killed today in encounter between security forces and terrorists in Tarigam, Kulgam. Arms & ammunition recovered.

184 people are talking about this

ANI

@ANI

J&K police: Deputy Superintendent of Police Aman Kumar Thakur who lost his life in an encounter with terrorists in Tarigam, Kulgam. He was a 2011 batch KPS Officer & had been heading counter terrorism wing of J&K police in Kulgam for past 1.5 years

356 people are talking about this

काही दहशतवादी तारिगाम भागात लपले असल्याची पक्की माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तातडीने या परिसराला घेराव घातला आणि शोधमोहिम सुरू केली. पण शोधमोहिम सुरू असतानाच दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. सुरक्षा रक्षकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

मात्र, या दरम्यान डीएसपी अमन ठाकूर यांना वीरमरण आलं. तर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड आत्मघाती हल्ला झाला होता. यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’नेच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button