breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

‘डीएसके’ने फसवणूक केल्याने ठेवीदाराची पुण्यात आत्महत्या

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी 

घर घेण्यासाठी ‘डीएसकें’कडे गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे पुण्यात एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके (वय 60, रा. भीमनगर, घोरपडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तानाजी कोरके यांनी मुलींच्या लग्नासाठी डी. एस. कुलकर्णी अर्थात ‘डीएसके’मध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, सहा वर्षांनंतरही हे पैसे परत न मिळाल्याने कोरकेंनी टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी ‘माझ्या आत्महत्येला डीसएकेंना जबाबदार धरा, त्यांची पोलिस चौकशी करा’ अशी मागणी केली आहे.

कोकरे यांनी 2014 मध्ये आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी स्वतःच्या नावे चार लाख तर नातवंडांच्या शिक्षणासाठी जावयाच्या नावे पन्नास हजार रुपये रक्कम डीएसके डेव्हलपर्स यांच्याकडे गुंतविली होती. 2017 मध्ये त्याची मुदत संपल्यावर रकमेसाठी त्यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच आली. तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी पैसे उधार घेतले. मात्र, चौथ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे ? याची चिंता कोरके यांना लागली होती. या चिंतेतून त्यांनी आयुष्य संपवत असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

डीएसके ग्रुपने ज्यादा व्याजाचे अमिष दाखवून राज्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनेक ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. या प्रकरणी डीएसके, त्यांची पत्नी, मुलगा आणि काही नातेवाईक सध्या तुरुंगात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button