breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डाॅ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिकला महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली

पिंपरी –  महापालिका प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून तर क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंगळवारी (दि.12) बदलीचे आदेश काढले  आहेत.

महापालिकेतील सहाय्यक आयुक्त डाॅ. महेशकुमार डोईफोडे यांची 5 ऑगस्ट 2014 रोजी पिंपरी महापालिकेत रूजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन व एलबीटी विभागाचा पदभार होता. त्यांची  12 फेबु्रवारीला  लातूर जिल्हातील उदगीर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. मात्र, या ठिकाणी ते रुजू झाले नव्हते. त्यांना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 31 मे पर्यंत पिंपरी पालिकेत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्याने अखेर त्यांची मंगळवारी नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तर महेशकुमार डोईफोडे यांच्या जागी उदगीर नगरपालिकेतून बदली होऊन आलेले नितीन कापडणीस यांची अवघ्या तीन  महिन्यामध्येच नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button