breaking-newsताज्या घडामोडीपुणे

डाॅ. अनिल राॅय यांच्यावर कारवाई कधी? – नगरसेवक माऊली थोरात यांचा सवाल

पिंपरी-  महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी यापुर्वी महापालिकेच्या पदाधिकारी व प्रशासनावर पत्रक काढून गंभीर आरोप केले होते. त्यांच्या विरोधात आयुक्त काही कारवाई करणार आहेत की नाही, याबाबत खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक माऊली थोरात यांनी शुक्रवारी महासभेत केली.  या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

यावेळी नगरसेवक माऊली थोरात म्हणालेकी , ” महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी देखील त्यानी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर पत्रक काढून अफरातफरी केल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यावेळी मी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देवून त्यांच्यावर  कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता डाॅ. के अनिल रॉय यांच्यावर अॅट्रासिटी व  फसवणुकीच्या कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे ” त्यामुळे महापालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार आहे का?, यावर आयुक्तांनी स्वतः खुलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button