breaking-newsराष्ट्रिय
डान्सर काकांना विदिशा महापालिकेचं मोठं गिफ्ट
भोपाळ: भन्नाट डान्समुळे अल्पावधित लोकप्रिय होत, देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या डान्सर काकांना, मध्य प्रदेशातील विदिशा महानगरपालिकेने एक गिफ्ट दिलं आहे. डान्सर काका अर्थात प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांची विदिशा महानगरपालिकेने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
संजीव श्रीवास्तव यांनी एका लग्न सोहळ्यात केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांच्या गोविंदा स्टाईल डान्सवर लोक अक्षरश: फिदा झाले. त्याचाच फायदा उचलण्यासाठी विदिशा महापालिकेने अचूक टायमिंग साधलं. संजीव श्रीवास्तव यांना विदिशा महानगरपालिकेने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं.