breaking-newsक्रिडा

डकवर्थ लुईस आणि इतर नियमांच्या आचारसंहितेमध्ये बदल

  • आयसीसीकडून तात्काळ अंमलबजावणीला सुरूवात

दुबई– आयसीसीकडून शनिवारी डकवर्थ लुईस नियम व त्याच्या आचारसंहितेमध्ये बदल करणार असल्याची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये लागलीच रविवार 30 सप्टेंबरपासून हा नियम अमलात आला आहे. डकवर्थ लुईस पद्धतीच्या नवीन संस्करणाला 2014 पासून सुरुवात करण्यात आली जो 700 एकदिवसीय सामने, 428 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून मिळालेल्या सूचनेवर आधारित होत्या. डकवर्थ लुईस प्रणालीचे एक पद्धत सर्व फॉरमॅटसाठी अनुकूल असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

क्रिकेटचे संचालन करणाऱ्या या संस्थेने खेळाडू व सहयोगी स्टाफच्या आचारसंहितेच्या सध्याच्या अपराधांसह आणखीन नवीन अपराधांची भर घातली आहे, तर सध्याच्या अपराधांमधील दंडामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन अपराधांमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या स्तरामधील चेंडूची छेडछाड वगळता धोक्‍याने फायदा मिळवण्याचा प्रयत्नाचा समावेश करण्यात आला आहे.

तिसऱ्या स्तरावरील अपराधांसाठी सर्वाधिक शिक्षा आठ निलंबन गुणांसह वाढून ती 12 निलंबन गुण (सहा कसोटी सामने किवा 12 एकदिवसीय सामने) करण्यात आली आहे. विश्‍वचषक स्पर्धेसाठी एक वर्षाहून कमीचा वेळ शिल्लक आहे. नियमातील हे सर्व बदल 30 सप्टेंबरपासून लागू होतील. या दिवशी दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वेदरम्यान पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button