breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांची ‘टिवटिव’ कायमची बंद

वॉशिंग्टन – अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत केलेल्या भयंकर हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातही हिंसा भडकण्याची भीती व्यक्त करत ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. ट्विटरच्या या कारवाईमुळे अध्यक्ष ट्रम्प यांची टिवटिव कायमची थांबली आहे. ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करताना त्यांचा प्रोफाईल फोटो काढला आहे. दरम्यान, ट्रम्प यांचं खातं बंद करण्यापूर्वी त्यांचे ८८.७ मिलियनच्याजवळ फॉलोअर्स होते.

दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीत धुडगूस घातला. ट्रम्प समर्थकांनी संसदेत शिरत प्रचंड हिंसाचार घडवून आणला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत चार जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचे काही ट्विट्स डिलीट केले होते. त्याचबरोबर त्यांचे अकाऊंटही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आता ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही कालावधीत केलेले ट्विट आणि त्यांच्या संदर्भाची समीक्षा केल्यानंतर त्यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंसा आणखी भडकण्याची शक्यता असून, ही कारवाई करण्यात येत असल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button