breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प यांनी अंत्ययात्रेला येऊ नये – सिनेटरची अजब इच्छा

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे सिनेटर जॉन मॅक्‍क्‍न यांनी एक अजब इच्छा प्रकट केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी आपल्या अंत्ययात्रेला येऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. 81 वर्षे वय असलेले सिनेटर जॉंन मॅक्कन हे ब्रेन कॅन्सरशी झुंजत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जॉन मॅक्केन यांनी म्हटले आहे, की अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी आपल्या अंत्ययात्रेत सामील व्हावे, पण डोनॉल्ड ट्रम्प यांनी मात्र हजर राहू नये असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. सिनेटर जॉन मॅक्केन हे सन 2008 साली अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत एक उमेदवार होते.

डोनॉल्ड्‌ ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यातील आपल्या एका भाषणात जॉन मॅक्केल यांना “गंदा आदमी’ म्हटले होते. ट्रम्प यांच्याबरोबर आपले संबंध चांगले नसल्यानेच ट्रम्प यांनी आपल्या अंत्ययात्रेस हजर राहू नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. जॉन मॅक्केन यांना ब्रेनकॅन्सर असल्याचे गेल्या जुलै महिन्यात दिसून आले होते.
जॉन मॅक्केन आपल्या कुटुंबीयांसह राहण्यासाठी ऍरिझोना येथे जात असल्याची माहिती त्यांची कन्या मेघानने दिली आहे ती इंटिरिअर डेकोरेटर आहे.

जॉन मॅक्वेन यांच्यासाठी वेळात वेळ काढून प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे तिने मनापासून आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button