breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प यांची भारतावर पुन्हा आगपाखड

वॉशिंग्टन – अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱ्या काही मालावर भारताने शंभर टक्के आयात शुल्क लागू केल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा आगपाखड केली आहे. ही शुद्ध अमेरिकेची लुबाडणूक असून अमेरिकेची लुबाडणी करणाऱ्या देशांशी आम्ही व्यापारी संबंध तोडून टाकू असा इशारा त्यांनी दिला आहे.

कॅनडातील क्‍यबेक शहरात जी 7 देशांच्या परिषदेच्या निमीत्त बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. अमेरिकचा वापर पिगीबॅंक सारखा केला जात आहे असे ते शनिवारी म्हणाले होते. प्रत्येक जण आम्हाला लुबाडण्यासाठीच प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.ते म्हणाले की केवळ विकसित देशच नव्हे तर भारतासारखे विकसनशील देशही आमचा असा गैरफायदा घेत आहेत असे त्यांनी नमूद केले.

भारताने अमेरिकेच्या हर्लि डेव्हीडसन कंपनीच्या मोटार सायकलवर वाढीव दराने आयात कर लागू केला आहे. त्याचा उल्लेख करून ट्रम्प यांनी आम्हीही भारताच्या हजारोहजारो मोटार सायकलींवरही असाच कर लागू करू असा इशारा दिला होता. या संबंधात आम्ही विविध देशांशी बोलत आहोत. त्यातून हा प्रकार थांबेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही त्या देशांशी व्यापार थांबवू असा इशाराही त्यांनी दिला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराचे प्रमाण वाढत असतानाच ट्रम्प यांनी हा इशारा दिल्याने त्याचे गंभीर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button