breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ट्रकच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षक व ट्रक चालकही जखमी

पुणे | महाईन्यूज |

सातारा रोडवरील बालाजीनगर येथील पुलावर भरधाव जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक दुभाजक ओलांडून समोर येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे हे जखमी झालेले आहेत. शिंदे हे गुन्हे शाखेच्या युनिट २ मध्ये नियुक्तीला आहेत. बालाजीनगर येथील बीआरटी मार्गावरील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाण पुलावर मंगळवारी रात्री ११ वाजता हा अपघात झालेला आहे. 

ट्रक कात्रजकडून स्वारगेटकडे जात होता. तर नितीन शिंदे हे आपले काम संपवून आंबेगाव खुर्द येथील घरी जात होते. उड्डाणपुलावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक (एमएच-०४-डीके-८८५१) दुभाजकावरुन विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेला. शिंदे हे कात्रजच्या दिशेने जात होते. ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली व या अपघातात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे जखमी झालेले आहेत व त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे. अपघातानंतर ते जागीच बेशुद्ध झाले होते व नागरिकांनी त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. उपचारानंतर ते शुद्धीवर आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. ट्रकचालकही जखमी झालेला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. घटनास्थळी आलेले सहकारनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button