breaking-newsक्रिडा

टेबल टेनिस स्पर्धा: महाराष्ट्राच्या खेळाडूंना दोन सुवर्णांसह सात पदके

  • राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे– इलेव्हन स्पोर्टस पूर्व विभागीय राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला चांगली कामगिरी कायम ठेवताना आपल्या खात्यात आणखीन दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची भर घातली. मुंबईतील आरजी बारुआ स्पोर्टस कॉम्पलेक्‍स इनडोअर स्टेडियम येथे ही स्पर्धा पार पडली.

राधिका सकपाळ व अक्षत जैन यांनी अनुक्रमे मुलींच्या कॅडेट व मुलांच्या कॅडेट गटात रौप्यपदकाची कमाई केली. तर गौरव पंचांगम व पृथा वर्टीकरने अनुक्रमे मुलांच्या कॅडेट व मुलींच्या सब-ज्युनियर गटात कांस्यपदक मिळवले. या पदकांचा भरणा झाल्याने महाराष्ट्राच्या खात्यात दोन सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्यपदक अशी पदके जमा झाली. मुलांच्या कॅडेट गटात अक्षत जैन व गौरव पंचांगम हे उपान्त्य फेरीत एकमेकांविरुद्ध लढले. अक्षतने पाच गेमपर्यंत चाललेल्या चुरशीच्या सामन्यात गौरवला नमवित अंतिम फेरी गाठली. त्यामुळे गौरवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात कर्नाटकच्या ऋषिकेश शेटलुरने 4-1 असे नमविल्याने अक्षतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या कॅडेट गटात राधिका सकपाळने उपान्त्य सामन्यात 3-0 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. पण पश्‍चिम बंगालच्या सयानी पांडाकडून अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे राधिकाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या सबज्युनियर गटात पृथा वर्टीकरने सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये विजय मिळवत उपान्त्य फेरी गाठली. मात्र हरयाणाच्या सुहाना सैनीकडून 0-4 असा पराभव पत्करावा लागल्यामुळे पृथाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button