breaking-newsआंतरराष्टीय

टिपू सुलतान म्हणजे ‘टायगर ऑफ मैसूर’- पाकिस्तान

इस्लामाबाद : पाकिस्तानने टिपू सुलतान संदर्भातला एक व्हिडिओ ट्विट केला आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून त्यात टिपू सुलतान हा कसा महान प्रशासक होता याचे वर्णन करण्यात आले आहे. या व्हिडिओत टिपू सुलतानची तुलना वाघाशी करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पाकिस्तान सरकारने ट्विट केलेल्या या व्हिडिओवरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

टिपू सुलतान मैसूरचा शासक होता इंग्रजांविरोधात लढताना त्याने वाघाच्या शौर्याने लढा दिला. त्यांना पहिले स्वातंत्र्य सेनानी मानले जाते. टिपू सुलतानच्या २१९ व्या पुण्यातिथीनिमित्त आम्ही हा व्हिडिओ प्रसारित करतो आहोत असेही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

कर्नाटक सरकारने २०१५ या वर्षात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये टिपू सुलतानच्या जयंतीवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये वाद झाला. टिपू सुलतान एक महान शासक होता म्हणून आम्ही त्याची जयंती साजरी करणार अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर टिपू सुलतान हा क्रूर शासक होता त्याने शेकडो हिंदूंची कत्तल केली. त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्यांचे धर्मपरिवर्तन केले असा आरोप करत भाजपाने टिपू सुलतान जयंतीला विरोध दर्शवला होता. आता पुन्हा एकदा टिपू सुलतानचे नाव कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या वेळी चर्चेत आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button