breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

टिपू सुलतान टि्वटवरुन शशी थरुर यांनी केले इम्रान खान यांचे कौतुक

काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे कौतुक केले आहे. इम्रान खान यांनी टिपू सुलतान यांच्या स्मृतीदिनी टि्वट करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्याबद्दल शशी थरुर यांनी इम्रान खान यांची प्रशंसा केली आहे. इम्रान खान यांच्याबद्दल एक गोष्ट मला माहित आहे. भारतीय उपखंडातील इतिहासाबद्दल त्यांना असणारी रुची प्रामाणिक आणि व्यापक आहे असे शशी थरुर यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

Shashi Tharoor

@ShashiTharoor

One thing i personally know about @imranKhanPTI is that his interest in the shared history of the Indian subcontinent is genuine & far-reaching. He read; he cares. It is disappointing, though, that it took a Pakistani leader to remember a great Indian hero on his punyathithi.

Imran Khan

@ImranKhanPTI

Today 4th May is the death anniversary of Tipu Sultan – a man I admire because he preferred freedom and died fighting for it rather than live a life of enslavement.

3,803 people are talking about this

चार मे रोजी इम्रान खान यांनी टि्वट केले होते. आज चार मे टिपू सुलतान यांचा स्मृती दिन आहे. मला त्यांचे कौतुक वाटते. गुलामी पत्करुन जगण्यापेक्षा त्यांनी स्वातंत्र्य पसंत केले आणि ते मिळवण्यासाठी लढताना त्यांचा मृत्यू झाला असे टि्वट इम्रान यांनी केले होते. इम्रान खान उपखंडाचा इतिहास वाचतात त्याची काळजी घेतात असे थरुर यांनी म्हटले आहे. एका महान भारतीय नायकाच्या पुण्यतिथीचे पाकिस्तानी नेता स्मरण करतो हे निराशाजनक आहे असे थरुर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

Imran Khan

@ImranKhanPTI

Today 4th May is the death anniversary of Tipu Sultan – a man I admire because he preferred freedom and died fighting for it rather than live a life of enslavement.

12.9K people are talking about this

इम्रान खान यांनी टिपू सुलतान यांची स्तुती करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला असताना पाकिस्तानी संसदेचे संयुक्त सत्र बोलावले होते. त्यावेळी सुद्धा इम्रान यांनी टिपू सुलतान यांच्या शौर्याचे कौतुक केले होते. शशी थरुर यांच्या टि्वटवरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button