breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन

  • ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड!
    पुणे – ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी गुरुवारी दुपारी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कडकोळ यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकेत त्यांनी काम केले आहे. ‘झपाटलेला’ या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका विशेष गाजली होती.

    राघवेंद्र यांनी कृष्णधवल या चित्रपटापासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी रंगभूमीवर काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर अशा दिग्गज कलावंतांसोबत काम केले. झपाटलेला या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या मांत्रिकाच्या भूमिकेला रसिकांनी डोक्यावर घेतले होते. झपाटलेला चित्रपटावेळी राघवेंद्र यांचे वय 50 होते तर झपाटलेला 2 वेळी ते 70 वर्षांंचे होते. या दोन्ही चित्रपटात त्यांनी बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा साकारली होती.

    राघवेंद्र यांनी ‘ब्लक अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ‘छोडो कल की बात’ या हिंदी चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका साकारली होती. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येतेसारख्या चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्यातील कलागुणांमुळे त्यांना बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. दोन वर्षांपूर्वी राघवेंद्र यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button